Ad will apear here
Next
सूत्रसंचालनाचे अंतरंग
ज्यांना सूत्रसंचालन व वक्तृत्वाची कला विकसित करायची आहे,त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक म्हणजे ‘सूत्रसंचालनाचे अंतरंग.’ सूत्रसंचालक आणि वक्ते यांना उपयोगी ठरू शकतील, अशी अनेक उद्धृते, ओव्या आणि अशा बऱ्याच गोष्टी प्रा. दिगंबर मारुती ढोकले यांनी या पुस्तकात संकलित केल्या आहेत. काषाय प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाचा हा परिचय...
............
ज्यांना सूत्रसंचालन व वक्तृत्वाची कला विकसित करायची आहे, त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक म्हणजे ‘सूत्रसंचालनाचे अंतरंग.’ या पुस्तकामध्ये ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या, संत तुकारामांच्या निवडक अभंगांच्या ओळी, संस्कृत सुभाषिते (अर्थासह), हिंदी शायरी व इंग्रजीमधील दर्जेदार अवतरणे आहेत. तसेच आई, मराठी भाषा, वडील, शिक्षक, तरुण, महिला, देशभक्ती, राजकारण, विवाह, पालक इत्यादी विविध विषयांवर मराठीतील दर्जेदार वाक्ये, विचार यांचे संकलन आहे. बोधकथा, शाळांमध्ये साजरे होणारे दिनविशेष, विविध राष्ट्रपुरुषांची थोडक्यात माहिती, श्री दत्तगुरूंचे २४ गुरू अशा माहितीचाही पुस्तकात अंतर्भाव केलेला आहे. सूत्रसंचालन करताना स्वागत, दीपप्रज्वलन, वृक्षपूजन, आभारप्रदर्शन आदींसाठी लागणाऱ्या साहित्यसामग्रीबद्दलची माहितीही यात देण्यात आली आहे.

प्रा. दिगंबर ढोकले यांनी विविध व्याख्यानांत ऐकलेली, विविध पुस्तकांत वाचलेली चांगली वाक्ये, विचार यांचा समावेश आपल्या या पुस्तकात केला आहे. ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. त्यांच्या मतानुसार, हे पुस्तक कीर्तनकार, प्रवचनकार यांनाही उपयुक्त आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ यांनी तर या पुस्तकाला सूत्रसंचालकाची शिदोरी असे म्हटले आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे महाव्यवस्थापक विवेक सावंत म्हणतात, ‘सूपभर लाह्यांत दडलेला एकच बत्तासा हुडकून काढून तो इतरांना देण्याचा प्रयत्न करणाऱ्या वारकऱ्याच्या मुलाप्रमाणे प्रा. ढोलके यांचे हे संकलन आहे.’ 

लायन्स क्लबचे प्रांतपाल ला. गिरीश मालपाणी, सुप्रसिद्ध वक्ते राज मुछाल, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुदाम मोरे यांचे शुभेच्छा संदेश या पुस्तकाला लाभले आहेत. विविध सार्वजनिक कार्यक्रम, तसेच व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या विविध प्रसंगांसाठी अनुरूप अशा साहित्याचा आणि वक्तृत्वासाठीच्या विचारधनाचा खजिना या पुस्तकाद्वारे वाचकांसाठी खुला झाला आहे.

पुस्तक : सूत्रसंचालनाचे अंतरंग
संकलक : प्रा. दिगंबर मारुती ढोकले
प्रकाशन : काषाय प्रकाशन
पृष्ठे : १९२
मूल्य : २०० रुपये

(‘सूत्रसंचालनाचे अंतरंग’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZYMBP
Similar Posts
सूत्रसंचालकाचा मार्गदर्शक जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्या शिकवावे’ या शिकवणुकीनुसार प्रा. ढोकले यांनी ‘सूत्रसंचालनाचे अंतरंग’ या पुस्तकातून उदयोन्मुख सूत्रसंचालकांना एकीकडे युक्तीच्या चार गोष्टी सांगत दुसरीकडे सूत्रसंचालनासाठी उपयुक्त ठरतील अशी अक्षरशः शेकडो चमकदार वाक्यं, समर्पक ओव्या/ सुभाषितं, सुंदर काव्यपंक्ती, उर्दू शेर आदींचा खजिनाच समोर आणून ठेवलाय
‘समाजाला जोडणारा बंधुतेचा विचार रुजावा’ पुणे : ‘आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत संवेदना, सहवेदना याची आवश्यकता असून, माणसांचे संघटन व्हायला हवे. समाजाचे ज्ञान वाढले आहे; परंतु ‘शहाणपण’ हरवले आहे. अशावेळी समाजाला शहाणे करणाऱ्या आणि एकमेकांशी जोडणाऱ्या बंधुतेच्या विचारांची रुजवण होणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक विधिज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले
‘बंधुतेशिवाय स्वातंत्र्य, समता अर्थहीन’ पुणे : ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या चार मूलभूत तत्वांवर भारताचे संविधान आधारले आहे. त्यातील केवळ स्वातंत्र्य व समता या दोन गोष्टींवरच अधिक भर दिला गेल्याने बंधुतेला दुय्यम स्थान मिळाले. परिणामी आज जाती-धर्म, गरीब-श्रीमंत अशा वर्गीय संघर्षात आपण अडकलो आहोत. बंधुतेशिवाय स्वातंत्र्य व समतेला अर्थ नाही
डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या सत्काराचे आयोजन पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम २० डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language